सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 डिसेंबर 2022 (12:05 IST)

लातूर : पत्नीसाठी सरपंच पदाचा प्रचार करताना पतीचा आकस्मात मृत्यू

राज्यात सध्या ग्राम पंचायत निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. लातूर जिल्ह्यातील मुरुड येथे ग्राम पंचायत निवडणुकीचा पत्नीच्या सरपंचपदासाठी  प्रचार करताना सभेत पतीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अमर पुंडलिक नाडे यांचे आकस्मात निधन झाले. अमर नाडे  यांच्या पत्नी अमृता नाडे या मुरुडमध्ये ग्राम पंचायत निवडणुकीत सरपंचपदाच्या उमेदवार आहे. 
 
सध्या ग्राम पंचायत निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी मुरुड शहरात सार्वजनिक चौकात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत पॅनल प्रमुख म्हणून अमर नाडे यांनी सभेला संबोधित केल्यावर व्यासपीठावर पत्नी अमृता नाडे  यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसले आणि काही क्षणातच त्यांनी मान टाकली. त्यांच्या आकस्मात मृत्यूने सभेत धावपळ सुरु झाली परिसरात त्यांच्या आकस्मित मृत्यूने शोककळा पसरली आहे. अमर नाडे  हे 45 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी अमृता नाडे, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. 
अमर नाडे  यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 
  
Edited By- Priya Dixit