लातूर मनपा आयुक्तांचा आत्महत्येचा प्रयत्न
लातूर महानगर पालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न करण्याची धक्कादायक घडली आहे.
सदर घटना शनिवारी रात्री त्यांच्या निवासस्थानी लातूर येथे घडली आहे. त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी डोक्यात गोळी झाडली ते या अपघातात गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळतातच त्यांना तातडीने लातूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला असून रिव्हॉल्वर ताब्यात घेतली आहे. मनोहरे यांनी असे टोकाचे पाऊल का घेतले पोलीस याचा शोध घेत आहे. कौटुंबिक कारणामुळे त्यांनी असे केल्याचा चर्चा सुरु आहे.
बाबासाहेब मनोहरे लातूरचे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून पदावर आहे. त्यांनी स्वतःच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला पोलीस याचा तपास करत आहे. या घटनेमुळे लातूर मध्ये खळबळ उडाली आहे.
Edited By - Priya Dixit