सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

नोकरी साठी दिले लाखो रुपये मुलाची नोकरी गेली, वडिलांची आत्महत्या

मराठवाडा येथील लातूर मध्ये फास्वनुकीचा एक प्रकार समोर आला असून त्यामुळे एका पित्याला आत्महत्या करावी लागली आहे. मुलाच्या नोकरीसाठी जवळपास २० लाख रुपये दिले असताना मुलाची नोकरी तर लागली नाही जेथे नोकरीला गेला तेथून वर्ष वर्षभरात नोकरीतून बाहेर काढले.त्यामुळे आयुष्याची पुंजी गेल्याच्या धक्क्याने पित्याने आत्महत्या केली आहे. संस्थाचालकासह चार जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा चाकूर पोलिसात दाखल करण्यात आला आहे.
 
लातूर जिल्ह्यातील  झरी (बु़) येथील शेतकरी सुधाकर सखाराम खंदारे यांच्या मुलास शिक्षकाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून संजय दिगंबर आलापुरे, कमलाकर नारायण जायभाये, मिराबाई कमलाकर जायेभाये संभाजी मूकनर पाटील आणि संस्थाचालक तनिष्क कांबळे यांनी खंदारे यांच्याकडून नोकरीसाठी अठरा लाख रुपये उकळले होते.
 
विशेष म्हणजे शेती विकून तसेच उसनवारी करुन खंदारेंनी अठरा लाख रुपये या चौघांना दिले. त्यानंतर संस्थाचालक तनिष्क कांबळे यांच्या मुंबई येथील शाळेवर विनायक सुधाकर खंदारे यास शिक्षकाची नोकरी देण्यात आली. नोकरी सुरु होऊन तब्बल एक वर्षाचा कालावधी उलटला तरी पगाराचा पत्ता नसल्याने खंदारे यांनी पगारासाठी विचारणा केली. त्यावेळी संस्थाचालकाने मुलाला तडकाफडकी नोकरीवरुन काढून टाकलं होते. पोलीस या गोष्टीचा तपास करत आहेत. जनजागृती होवून सुद्धा अनेक नागरीका पैसे देवून नोकरी स्विकारतात हे वास्तःव अजूनही बदलत नाहीये.