भाजप आमदारांच्या सभेत लॉरेन्स बिश्नोईचा बॅनर, फडणवीसांनी दिले कारवाईचे निर्देश
Nashik News : नाशिकच्या सिडकोत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सभेत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे बॅनर दिसल्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. हे बॅनर एका अल्पवयीन मुलाने लावल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी आंबड पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या सिडको भागात हिंदू विराटसभेचे आयोजन करण्यात आले होते. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होणाऱ्या हिंसाचाराच्या निषेधार्थ एक सभा आयोजित करण्यात आली असून या सभेत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सभेत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा एक मोठा बॅनर दिसला. बॅनर दिसतातच गोंधळ उडाला.
कोणत्याही गुंडांचे गौरव करणे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. असे फडणवीस म्हणाले. त्यांनी पोलिसांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आंबड पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.
Edited By - Priya Dixit