Festival Posters
✕

सांगलीत 5 वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला

Updated: बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (16:32 IST)

सध्या सर्वत्र उसतोडणीचे काम सुरु आहे. सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात तळवडे गावात देखील ऊस तोडणीचे काम सुरु असताना ऊस तोडणाऱ्या एका मजुराच्या उसाच्या शेतात लपून बसलेल्या बिबट्याने तिथेच खेळत असलेल्या पाच वर्षाच्या मुलावर हल्ला केला. हल्ल्यानंतर बिबट्याने मुलाला ओढून नेण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात मुलगा जखमी झाला आहे. गणेश श्रीराम कांबिलकर रा. मानकुरवाडी जी. बीड असे या चिमुकल्याचे नाव आहे. बिबट्याने मुलाला आपल्या जबड्यात धरून पळण्याचा प्रयत्न केला. मुलाचे नशीब बलवत्तर असल्याने तिथे ऊस तोडणाऱ्या महिलांनी ते पहिले आणि आरडाओरड करायला सुरु केले असता काही मजुरांनी त्या बिबट्याचा पाठलाग केला . बिबट्याने मुलाला तिथेच सोडून पळ काढला. या प्रकरणात गणेश च्या मानेवर आणि हनुवटीवर जखमा झाल्या असून त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता आता त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे गणेश हादरून गेला आहे. 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

सरकार ७ ते १८ डिसेंबर दरम्यान विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी संहिता विधेयक सादर करू शकते

LIVE: महिलांना ५० टक्के आरक्षण द्या! खासदार सुप्रिया सुळे यांची जोरदार मागणी

१ लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये मिळतात 'या' ५ दमदार बाईक्स! स्पोर्टी लूक, पॉवरफुल इंजिन अन् शानदार मायलेज

खासदार सुप्रिया सुळे यांनी महिलांसाठी ५० टक्के आरक्षणाची मागणी केली

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपली बॅट, हेल्मेट, जर्सी आणि कॅप क्रिकेट संग्रहालयाला दान केले

पुढील लेख
Show comments