1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (21:33 IST)

निलेश राणेंसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

शिवसेना कार्यकर्ता संतोष परब याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर घरी जात असताना आमदार नितेश राणे यांचे वाहन पोलिसांनी अडविल्याने जिल्हा न्यायालयाच्या आवारात हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला. भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांवर हल्ला केल्याने काही काळ तणाव वाढला होता. निलेश राणे यांच्या विरोधात सिंधुदुर्गात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे वातावरण तापले. मला कायदा शिकवू नका, असे निलेश राणे म्हणाले. याशिवाय निलेश राणे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी गाडी थांबवल्यानंतर नितेश गाडीतून खाली उतरला आणि कोर्टात पोहोचला. यापूर्वी त्यांनी वकिलांशी चर्चा केली होती. त्यानंतर आमदार राणे जिल्हा न्यायालयाच्या आवारातून कणकवलीकडे रवाना झाले.