सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 जुलै 2022 (15:21 IST)

बिबट्या थेट बंगल्याच्या बाल्कनीत, शर्थीचे प्रयत्नानंतर जेरबंद

leopard
नाशिकमधील सातपूर परिसरातील अशोकनगर येथे आज सकाळी बिबट्याचा धुमाकूळ पहायला मिळाला. पंढरीनाथ काळे यांच्या शिवतीर्थ बंगल्याच्या बाल्कनीत अचानक बिबट्या दिसल्याने परिसरात नागरिकांची प्रचंड पळापळ सुरु झाली. स्थानिकांनी तातडीने पोलिस आणि वनविभागाशी संपर्क केला. त्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा तेथे दाखल झाला. पाठोपाठ वनविभागाची रेस्क्यू टीमही सज्ज झाली. या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यातच रिमझिम पाऊसही सुरू होता. 
 
अखेर वनविभागाने या बिबट्याला बेशुध्द करुन जेरबंद केले आहे. बंगल्याच्या सात फुट संरक्षक भिंतीवरुन उडी मारुन बिबट्या बंगल्याच्या आवारात शिरला. त्यानंतर त्याने बाल्कनीत ठाण मांडले.