गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 जुलै 2022 (21:33 IST)

नाशिक क्षेत्रीय भविष्य निधी कार्यालयाने वर्षभरात केले ४१५ कंपन्याचे बँक अकाऊंट सील

क्षेत्रीय भविष्य निधि नाशिक कार्यालय अंतर्गत साल २०२१-२२ या वर्षा मधे एकूण ३०६०४५ दावे २० दिवसाच्या आत निकाली काढण्यात आले असून त्याचे सरासरी प्रमाण ९७.७९ टक्के आहे. यापैकी या वर्षात २९२९०९ दावे ऑनलाइन पध्दतीने भरण्यात आले होते व ते निकाली लावण्यात आले. तसेच २०२१-२२ च्या वर्षात २२३८ बीमा दावे (EDLI) मृत कर्मचा-याच्या वारसास एकूण रक्कम रुपये ४४१०.६८ लाख देण्यात आले आहेत. २०२१-२२ या वर्षात १५६ कंपन्यांवर 7A कायदया अंतर्गत कारवाई करण्यात आली तसेच ४८९ कंपन्यांवर 14B आणि 7Q अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे त्या पैकी ७१२ कंपन्या कडून ६९०१.१४ लाख वसूल करण्यात आले आहेत तसेच थकबाकीची मागणी १२५ कंपन्याकडून ३९५.२९ लाख वसूल करण्यात आले व ४१५ कंपन्याचे बँक अकाऊंट सील करण्यात आले असल्याची माहिती नाशिक क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त अनिल कुमार प्रीतम यांनी दिली.
 
यावेळी आयुक्तांनी सांगितले की, क्षेत्रीय भविष्य निधी कार्यालय नाशिक या कार्यालया अंतर्गत नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगांव, अहमदनगर हे पाच जिल्हयांचे कार्यक्षेत्र येत असून या कार्यालया अंतर्गत जिल्हा कार्यालय जळगांव व अहमदनगर कार्यरत आहेत॰ या कार्यालय क्षेत्रात एकूण २२ हजार ५५९ कंपन्याना भविष्य निधी कायदा लागू असून एकूण सभासद संख्या २३ लाख ३५ हजार ५१२ आहे. सध्या ४ लाख ६८ हजार ९६० सभासद नियमित भविष्य निधी वर्गणी भरत आहे. नाशिक कार्यालय अंतर्गत एकूण पेन्शनर १६००२८ इतके असून त्यापैकी १२२६७८ (८६.५१%) पेंशनर लोकांनी मागील वर्षी जीवण प्रमाण पत्र भरले असून नियमित पेंशन घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
नाशिक क्षेत्रीय भविष्य निधी कार्यालयात एकूण ३६६७ नवीन कंपन्यानी २०२१-२२ या वर्षात नोंदणी केली असून भविष्य निधी कायदा लागू करून घेतला आहे॰ भविष्य निधि कायद्या अंतर्गत सर्व दावे आता ऑनलाइन पद्धतीने भरण्याचे सकती करण्यात आली आहे त्या साठी सर्व सभासदाने e-nomination करणे आवश्यक आहे॰ आजपर्यंत १२११७५ सभासदाने e-nomination पूर्ण केलेले असून ज्या सभासदाने केलेले नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावे असे आवाहन नाशिक क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त अनिल कुमार प्रीतम यांनी केले