बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 एप्रिल 2021 (08:01 IST)

रहिवासी भागातील अपार्टमेंटच्या डक्टमधून बिबट्या जेरबंद फोटो

नाशिकच्या  गंगापूररोड परिसरातल्या सावरकरनगर भागात बिबट्याचे दर्शन सकाळच्या सुमारास झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. काही नागरिकांनी तत्काळ महापालिकेच्या अग्निशमन विभागाला तर काही नागरिकांनी पोलिसांना फोन करुन ही माहिती दिली. त्यानंतर महापालिका, वनविभाग आणि पोलिस यांचे संयुक्त पथक घटनास्थळी पोहचले आहे. तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
 
दोन ते अडीच तासापासून या बिबट्याचा शोध सुरू होता. अखेर या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. एका अपार्टमेंटच्या डक्टमधून बिबट्याला पकडण्यात आले आहे. वनविभागाच्या पथकाने सर्वप्रथम या बिबट्याला बंदुकीच्या गोळीद्वारे बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर मोठ्या जाळीमध्ये त्याला पकडण्यात आले. त्यानंतर बिबट्याला पिंजऱ्यात टाकण्यात आले. रेस्क्यू व्हॅनद्वारे वनविभाग बिबट्याला घेऊन गेला आहे.
 
बिबट्या परिसरात आल्याचे समजताच मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली आहे. विशेष म्हणजे कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. असे असतानाही नागरिकांनी मोठी गर्दी केली.