गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (08:51 IST)

'निवडणुका लागल्यास एकत्र येऊ'; प्रकाश आंबेडकर यांनी घोषणा केली

prakash ambedkar
एकत्र कधी येणार हे निवडणुका कधी लागतील त्यावर अवलंबून आहे. आता लागल्या तर ताबडतोब. नंतर लागल्या तर नंतर, अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली. प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिदिनी पुस्तक, ग्रंथ, लेख आदींच्या वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली. तर कार्यक्रमात वंचित समाजाला उभे करण्याचे काम बाबासाहेबांनी केले. स्वातंत्र अबाधित राखण्यासाठी जे जे सोबत येतील त्यांच्यासोबत आम्ही जाणार, असल्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले.

कार्यक्रमापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात १५ मिनिटे बंद दाराआड चर्चा झाल्याचे एका वृत्त वहिनीला सूत्रांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे-आंबेडकर एकत्र येणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतू काही दिवसांपूर्वीच आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमात एकत्र आले होते. यावरून उलटसुलट चर्चा सुरु होती. यावर आज आंबेडकर यांनी पडदा टाकला.

Edited By -Ratnadeep Ranshoor