1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 मार्च 2022 (09:16 IST)

शिवसेना खासदार संजय राऊतांसह कार्यकाळ संपणाऱ्या राज्यसभा खासदारांची यादी जाहीर. कुणाला डच्चू, कुणाला पुन्हा संधी?

विधान परिषद आणि राज्यसभेतील काही सदस्यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. त्यात मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याही नावाचा समावेश आहे. त्यामुळे यातल्या कुणाला पुन्हा संधी मिळणार आणि कुणाला डच्चू मिळणार याकडेही सर्वाचं लक्ष लागलं आहे.
 
कार्यकाळ संपणाऱ्या खासदारांमध्ये महाराष्ट्रातील एकूण 6 खासदारांचा समावेश आहे. त्यात शिवसेना खासदार संजय राऊत, भाजप खासदार पियुष गोयल, काँग्रेस खासदार पी. चिदंबरम, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, भाजपचे विकास महात्मे आणि विनय सहस्त्रबुद्धे यांची नावं आहेत.
 
त्यामुळे ही यादी आता चर्चेत आहे. या सर्व सदस्यांचा कार्यकाळ हा 4 जुलै रोजी संपणार असल्याची तारीख यादीत देण्यात आली आहे.