1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 मार्च 2022 (08:44 IST)

पवार साहेब , तुम्ही अजून साडेतीन जिल्ह्यांतच अडकलात : भाजप

कोणत्याही परिस्थितीत राज्यात भाजपाचं सरकार येऊ देणार नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते. त्यालाच आता भाजपनं आपल्या ट्विटर हँडलवरून प्रत्युत्तर दिलंय. आदरणीय पवार साहेब, भाजपची काळजी करू नका! स्वतःच्या पक्षाचे 60 च्या वर आमदार निवडून आणा. इतर प्रादेशिक पक्षांनी 10 वर्षांत दोन राज्यात सत्ता स्थापन केली, तुम्ही अजून साडेतीन जिल्ह्यांतच अडकलात. 55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा, असा टोलाही भाजपानं शरद पवारांना लगावलाय.
 
आदरणीय पवार साहेबजी, कोण येणार? कोण नाही हे सर्व महाराष्ट्रातील जनता ठरवते. लोकशाहीत जनता सर्वश्रेष्ठ असते, तुम्ही नाही. जनतेने भाजपला 105 जागा दिल्यात. तुम्ही पावसात भिजूनही त्याच्या अर्धे आमदारही निवडून आणू शकला नाहीत. जनमताचा अनादर करणाऱ्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल, असंही भाजपवाले म्हणालेत.
 
तसेच भाजपला येऊ न देण्याच्या गोष्टी नंतर करा. आधी हे प्रश्न सोडून दाखवा. राज्यात एसटी बंद, 6 महिन्यांपासून कर्मचारी संपावर आहेत. राज्यात शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे, पिकं उभं उभं करपून जात आहे. मराठा, OBC आरक्षणाचा प्रश्न सोडून दाखवा, असं आव्हानही भाजपनं शरद पवारांना दिलंय.