सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (21:45 IST)

पवारसाहेब, अशा व्यक्तीला आपण मुख्यमंत्री केलं, या शब्दांत राणे यांच्याकडून संताप व्यक्त

ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात उंदीर मारला नाही, ते कोथळा काय बाहेर काढणार, असा सवाल करत नारायण राणे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर शरसंधान साधलं. मुख्यमंत्र्यांनी बीडीडी चाळीच्या कार्यक्रमात जे शब्द उच्चारले तो कोणता सुसंस्कृतपणा होता. पवारसाहेब, अशा व्यक्तीला आपण मुख्यमंत्री केलं आपण, अशा शब्दांत राणेंनी पत्रकार परिषदेत आपला संताप व्यक्त केला.
 
गेले काही दिवस दौरा जनआशीर्वाद यात्रा सुरू असताना सगळी माहिती मला मिळत होती. काही लोक चांगुलपणाचा फायदा उचलतात, हेही लक्षात आलंय. त्यावर लगेच काही बोलणार नाही. मात्र, ही यात्रा पंतप्रधान मोदींना पंतप्रधान म्हणून ७ वर्षे झाली. त्यांनी केलेली कामे, भारताला दिलेल्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी ही यात्रा आहे.
 
मी असं काय बोललो. ज्याचा राग आला. प्रश्न असा आहे, भूतकाळात एखादी गोष्ट घडली, त्याची माहिती दिली. शिवसेना नेत्यांनी असे शब्द विचारले नाहीत? बीडीडी चाळीचा कार्यक्रम होता. त्यावेळी ते महाशय बोलले की, सेना भवनाबद्दल अशी कुणी भाषा करेल तर त्याचे थोबाड तोडा. हा क्राईम नाही? सांगा मला. न्यायालयातून निघाल्यानंतर पहाटे पाचला घरी पोहोचलो. हायकोर्टात शिवसेनेकडून ज्या ज्या केसेस दाखल होत्या त्यावर माझ्याबाजूने निकाल लागला. याचाच अर्थ देश कायद्याने चालतो हे सिद्ध झालेले आहे, असेही राणे म्हणाले.