गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (21:43 IST)

संजय राऊत यांचा मिम शेअर करत अप्रत्यक्षपणे नारायण राणे यांच्यावर निशाणा

Sharing Sanjay Raut
राज्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर वातावरण तापलं. राज्यात अनेक ठिकाणी शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली आणि नंतर रात्री त्यांची जामीनावर सुटकाही झाली. पण शिवसेना-भाजपच्या नेत्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरुच आहेत. नारायण राणे यांच्यासह भाजप नेत्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि राज्य सरकारवर आरोप केले. 
 
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही एक मिम शेअर करत अप्रत्यक्षपणे नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक मीम्स शेअर केला आहे. त्यांनी वाघाच्या तोंडात कोंबडी असल्याचा फोटो शेअर करत 'आजचा दिवस थोडक्यात' असं ट्वीट केलं आहे. सोशल मीडियावर हे ट्विट चांगलंच व्हायरल झालं आहे.