सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (15:58 IST)

वरुण सरदेसाईंवर एफआयआर दाखल करा अन्यथा भाजयुमो आंदोलन करेल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत कानशिलात लगवण्याचे वक्तव्य केले.यानंतर मुंबईतही जुहू येथील नारायण राणे यांच्या बंगल्या जवळ शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी आदित्य ठाकरेंचा मावसभाऊ आणि युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे युवासेनेच्या आंदोलनाचे नेतृत्व करत होते.या आंदोलनादरम्यान शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक, शिवगाळी सुरू केली.आंदोलन खूपचं चिघळले.परिस्थिती हात बाहेर जात असल्यामुळे पोलीस सर्व कार्यकर्त्यांना मागे जाण्यास सांगत होते. मात्र यावेळी वरुण सरदेसाई पोलिसांना शिवीगाळ करताना दिसले.त्यामुळे सध्या वरुण सरदेसाईंवर एफआयआर दाखल करा अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाकडून केली जात आहे.
 
वरुण सरदेसाई यांचा पोलिसांना शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होताना दिसत आहे.एका मराठी वृत्तवाहिनीवरील हा व्हिडिओ असून त्यामध्ये पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नात असताना वरुण सरदेसाई लाईव्ह सुरु असतानाच शिवीगाळ करताना आहेत.त्यामुळे आता भाजयुमो मुंबईचे अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांनी पोलीसअधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी वरुण सरदेसाई यांच्या विरोधाततक्रार दाखल केली आहे.तेजिंदर सिंह तिवाना यांनी निवेदनात म्हटले आहे की,पोलिसांनी जर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे तर त्यांनी वरुण सरदेसाई यांच्याविरोधातही एफआयआर नोंदवावा.जर पोलिसांना एफआयआर नोंदवला नाही तर भाजयुमो आंदोलन करेल,असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे