शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (12:12 IST)

शिवसेना आमदारांकडून राणेंना मारण्याची धमकी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर  महाराष्ट्रात शिवसैनिकांचा संताप झाला असून त्याचे पडसाद बघायला मिळाले.शिवसैनिकांनी ठिकठिकाणी आंदोलन केली. 
 
आक्षेपार्ह वक्तव्य करण्यासाठी नारायण राणे यांच्यावर अटक करण्याची कारवाई  करण्यात आली.या दरम्यान हिंगोली शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी नारायण राणे यांना मारण्याची धमकी दिली आहे.त्यामुळे या सम्पूर्ण प्रकरणात आता नवीन प्रकरण उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.बांगर यांनी राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याची प्रेतयात्रा काढली आणि राणे यांच्या विरोधात प्रक्षोभक विधान केले आहे .त्यांनी  'पोलिसांना जरा बाजूला करा राणेंचा कोथळा बाहेर काढेन' असे विधान केल्यानं भाजपचे कार्यकर्ताही संतापले आहे.ते आमदारांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करत आहे.