सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (10:08 IST)

सीबीएसई दहावी -बारावीची फेर परीक्षा आजपासून, ऑफ लाईन पद्धतीने होणार

केन्द्रीय माध्यमिक शिक्षण मंडल (सीबीएसई)च्या वतीने घेण्यात येणारी दहावी -बारावीची फेर परीक्षा आज 25 ऑगस्ट पासून देशभरात ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.जुलै महिन्यात अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर केलेल्या निकालावर असमाधानी असलेल्या विध्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येत आहे.कोरोनाच्या प्रतिबंध नियमांचे पालन करण्याच्या सूचना सीबीएसई बोर्डाकडून परीक्षा क्रेंद्रावर देण्यात आल्या आहे.परीक्षा केंद्रावर विध्यार्थ्यांना आपल्या सोबत हॉल तिकीट आणणे आवश्यक आहे.त्या शिवाय विध्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही.विद्यार्थ्यांनी मास्क लावणे बंधन कारक आहे.तसेच सामाजिक अंतर राखणे देखील आवश्यक आहे.
 
बारावीचा पहिला पेपर इंग्रजीचा असून शेवटचा पेपर होम सायन्स चा असणार.तर दहावी चा माहिती तंत्रज्ञानाचा पहिला पेपर असून शेवटचा पेपर गणिताचा असणार. ही परीक्षा आज पासून ऑफलाईन पद्धतीने सुरु होऊन 15 सप्टेंबर पर्यंत असणार.या परीक्षेचा निकाल 30 सप्टेंबर पर्यंत लागण्याची शक्यता आहे.