सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (09:02 IST)

लॉज मिळवून देण्याच्या नावाखाली राजस्थान येथील पर्यटकांना लुटणाऱ्या तिघांना अटक

नाशिकमधील नाशिकरोडला परिवार हॉटेल जवळ लॉज मिळवून देण्याच्या नावाखाली राजस्थान येथील पर्यटकांना लुटणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली.नदीम सलीम बेग(वय २२,विहीतगाव,दीपक अशोक पताडे (वय १९) शुभम दिलीप घोटेकर (वय १८ दोघेही विहीतगाव)अशी संशयितांची नावे आहेत.
 
शुक्रवारी (ता.२०) रात्री साडे नउच्या सुमारास परिवार हॉटेल समोर लॉजच्या शोधात असलेल्या राजस्थान येथील संतोषकुमार अर्जुनलाल मिना (वय २६, बसवा, जि.दौसा )यांना संशयित नदीम बेग याने गाठले व त्यांना लॉज मिळवून देण्याच्या बहाण्याने त्याला दुचाकी (एमएच १५ सीई ४५१९) हिच्यावर बसवून विहीतगावला विठ्ठल मंदीर परिसरात नेले तेथे जीवे मारण्याची धमकी देत, त्याच्या खिशातून पाकीट जबरदस्तीने काढून घेत, शिवीगाळ केली.तसेच रोख २२०० रुपये आणि मोबाईल हिसकावून घेतला. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिन्ही संशयितांना अटक केली आहे.