रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 ऑक्टोबर 2017 (17:29 IST)

राज्यात मुंबई वगळता ऑक्टोबरमध्ये अघोषित लोडशेडिंग

राज्यात एन् ऑक्टोबरमध्ये  जोरदार लोडशेडिंग सुरु केले आहे. कोणत्याही वेळी न सांगता अनेक ठिकाणी अचानक वीजपुरवठा बंद होत असून त्यामुळे अनेक नागरिक वैतागले आहेत. यामध्ये कोळसा उपलब्ध नसल्याने हा प्रकार सुरु झाला आहे. तर विजेचा वापर वाढल्यामुळे राज्यात तातडीचं भारनियमन लागू करण्यात आलं आहे. राज्यात जवळपास  दीड ते दोन हजार मेगावॅटची तूट आहे.  ऑक्टोबर हिटमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना महावितरणने हा मोठा धक्का दिला आहे.
 

 साडे सतरा हजार मेगावॅट  राज्यात वीज मागणी आहे.  सोळा ते साडे सोळा हजार मेगावॅट वीज उपलब्ध होते. तर  वीज गळतीचं प्रमाण, वीज बिलं थकवणाऱ्यांची संख्या या सर्व कारणांमुळे राज्यात लोडशेडिंग सुरु आहे. मात्र याचा त्रास अनेक नागरिकांना भोगावा लागत आहे. न सांगता पूर्व सूचना न देता राज्यात जवळपास  तीन ते साडेचार तासांचं हे भारनियमन सुरु आहे.  ए आणि बी ग्रुप म्हणजे या ग्रुपमधील वीज ग्राहक हे नियमित वीज बिलं भरणारी आणि वीज गळतीचं प्रमाण जवळपास नसलेली आहेत. तर सी आणि डी ग्रुपमधील ग्राहक वीज बिल नियमित न भरणारी आणि वीज गळतीचं प्रमाण अधिक असणारी आहेत.