बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 जानेवारी 2025 (18:07 IST)

प्रवासी पडल्यावर लोको पायलटने ट्रेन रिव्हर्स गियरमध्ये टाकली, अर्धा किलोमीटर ट्रेन पळवली

train
माणुसकी या जगात खूपच कमी झाली आहे. मात्र महाराष्ट्रात भारतीय रेल्वेने माणुसकीचे अनोखे उदाहरण मांडले आहे. डब्यातून प्रवासी खाली पडल्यावर लोको पायलटने चक्क रेल्वेचे रिव्हर्सगिअर लावून अर्धा किलोमीटर ट्रेन पळवली. दुर्देवाने त्या जखमी प्रवासीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी सरवर शेख हे उत्तर प्रदेशातील रहिवासी असून तपोवन एक्सप्रेस गाडीतून प्रवास करताना मनमाड जंक्शनवर आल्यावर डब्यातून खाली पडले. ट्रेनच्या लोको पायलटला ही माहिती मिळाल्यावर त्याने कंट्रोलरची परवानगी घेतली आणि जखमी शेख यांना उचलण्यासाठी चक्क ट्रेन रिव्हर्स गिअर मध्ये नेली. या ट्रेनसाठी मागून येणारी मालगाडी स्थानकाच्या पूर्वी थांबवण्यात आली जेणे करून ट्रेनसाठी जागा मिळावी. 

ट्रेनमध्ये उपस्थित प्रवाशांच्या मदतीने शेख यांचा शोध घेत ट्रेन मनमाड स्थानकावर पोहोचली. तो पर्यंत शेख यांना रेल्वे प्रशासनाने रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेले. नंतर ट्रेन नांदेडकडे रवाना झाली. 
Edited By - Priya Dixit