Daily Horoscope
✕

भाजप महापौर उपमाहापौर यांना लॉटरी

Updated: बुधवार, 14 ऑगस्ट 2019 (10:29 IST)
 
१५ सप्टेंबर ला नाशिकच्या महापौर उपमहापौर यांच्या निवडणूका होणार होत्या परंतु विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या कालावधीत राज्यातील ज्या महानगरपालिकांमधील महापौर व उपमहापौरांचा कालावधी संपुष्टात येणार आहे, अशा महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुका तात्पुरत्या स्वरुपात ३ महिने पुढे ढकलण्यासह त्यासाठी अध्यादेश काढण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे हि मुदत वाढ नाशिकच्या महापौर आणि उपमहापौर यांना  मिळणार असून अडीच वर्षाचा कालावधीला ३ महिने मुदत वाढ मिळणार आहे.परंतु भविष्यात येणाऱ्या महापौर व उपमहापौर यांचा कालावधी ३ महिन्यांनी कमी होणार आहे. 
 
राज्यात ऑक्टोबर-२०१९ मध्ये विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका प्रस्तावित आहेत. विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकामुळे महापौर निवडणूक पार पाडण्यात अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी महापौर व उप महापौरांच्या निवडणुका तात्पुरत्या ३ महिन्यांसाठी पुढे ढकलण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महापौर व उपमहापौर निवडणूक पुढे ढकलण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका (राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यांच्यामुळे विवक्षित महानगरपालिकांचे महापौर व उपमहापौर पदांसाठीच्या) निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे अधिनियम- २०१९ हा अध्यादेश काढण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

३ ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा गौरव दिन: आपल्या मातृभाषेचा ऐतिहासिक सन्मान

Marathi Abhijat Bhasha Gaurav Din 2026 Wishes in Marathi मराठी अभिजात भाषा गौरव दिन शुभेच्छा

'मी हनुमान चालीसा म्हणत होतो...': कॅप्टन स्मित मच्छार यांनी पंतप्रधान मोदींना सांगितला शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवल्याचा थरार अनुभव

नवज्योत सिंग सिद्धू आजोबा झाले; नातीला दिले देवी दुर्गेशी संबंधित खास नाव, जाणून घ्या त्याचा अर्थ

लिफ्टमध्ये लघवी पिताना दिसला डिलिव्हरी बॉय; दुर्गंधीमुळे सुरुवातीला कुत्र्याचा संशय, पण सीसीटीव्हीने सत्य उघड केले

पुढील लेख
Show comments