मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 नोव्हेंबर 2018 (09:33 IST)

आयुक्त मुंढेची बदली, वाजवले फटाके, भाजपा महापौर यांच्यावर गुन्हा दाखल

सध्या आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे राज्यातील चर्चेचा विषय झाला आहे. त्यांची बदली म्हणजे बातमीचा मोठा विषय होतो. आता तुकाराम मुंढे यांच्या मुले नाशिक सत्तधारी भाजपवर नामुष्की आली आहे, नागरिक तर नाराज आहेतच नाशिक महापालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त तुकाराम मुंढे यांची नुकतीच मंत्रालयामध्ये बदली झाली. बदलीचा आनंद साजरा करण्यासाठी महापौर बंगल्याच्या बाहेर फटाके फोडले होते. फटाके फोडणं भाजप कार्यकर्त्यांच्या अंगाशी आले आहे. कारण फटाके फोडल्याप्रकरणी मुंढे समर्थकांनी महापौर आणि भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केलीय. महापौर आणि भाजपचे कार्यकर्ते यांनी मुंढे यांच्या बदलीचं समर्थन करण्यासाठी फटाके फोडल्याची तक्रार सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल केली. आपल्या देशात सण उत्सव वगळता फटाके फोडायचे नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या नियमांचं उल्लंघन करत नाशिकच्या महापौर रंजना भासनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडल्याची तक्रार करत, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंढे समर्थकांनी केली आहे. सामान्य नागरिकांना जर एक न्याय असेल तर मग महापौरांना दुसरा न्याय का? असा सवाल मुंढे समर्थकांनी उपस्थित केला आहे.त्यावर कारवाई करत नाशिकच्या सरकारवाडा येथे महापौर आणि समर्थक कार्यकर्ते यांच्न्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. राज्यातील ही पहिलीच घटना असावी त्यात महापौरांवर गुन्हा दाखल झाला असून त्यातही राज्य आणि केंद्र व मनपात त्यांची एकहाती सत्ता असतांना घडले आहे. तुकाराम मुंढे यांना नागरिकांनी खूप मोठा पाठींबा दिला आहे.