शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018 (17:06 IST)

उत्तरपत्रिकेवर व्हाईटनर लावण्याच्या प्रकरण लातूर मध्ये आंदोलन

लातूर येथील परीक्षांच्या उत्तरपत्रिकेवर व्हाईटनर लावण्याच्या प्रकरणात राज्यपाल यांच्या आदेशाने चौकशी समिती नेमण्यात आली होती. चौकशी समितीचा अहवाल सादर होऊनही कारवाई करण्यास स्वारातिम विद्यापीठ विलंब करत आहे त्या निषेधार्थ युवासेनेने लातुरच्या विद्यापीठ केंद्रासमोर बोंबाबोंब आंदोलन केले. लातूर येथील एमएस बिडवे अभियांत्रिकी कॉलेज येथे स्वारातीम विद्यापीठ नांदेड यांचे अधिकृत पेपर तपासणी केंद्र असताना या केंद्रावर उत्तरपत्रिकेवर व्हाईटनर लावून मार्कांत छेडछाड आणि पुनर्मुल्यांकनामध्ये ठराविक विद्यार्थ्यांचे मार्क वाढविण्यात आल्याची तक्रार युवासेना सहसचिव तथा सिनेट सदस्य प्रा. सूरज दामरे यांनी राज्यपाल आणि कुलगुरू यांच्याकडे केली होती. याची दखल घेऊन तीन सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. चौकशी समितीने आपला अहवाल सादर करून महिना उलटून गेला तरी दोषींवर कारवाई केली जात नाही यावरून कुलगुरू आरोपींना पाठीशी घालत आहेत आणि अशा गैरप्रकारांना जणू त्यांची समंतीच आहे हे दाखवून देत आहेत. दोषींवर कारवाई होत नाही त्यामुळे युवासेनेच्या वतीने स्वारातीम विद्यापीठ उपकेंद्रासमोर युवासेनेने बोंबाबोंब आंदोलन केले. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन आणखी तीव्र होईल. होणाऱ्या गैरसोयीस पूर्णपणे विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहील असे प्रा. सूरज दामरे यांनी यावेळी बजावले.