मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

विकृत मानसिकता: मुंबईत कुत्र्यावर सामूहिक बलात्कार, मृत्यू

मुंबईच्या मालाडच्या मालवणी भागात कुत्र्यावर बलात्कार करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गंभीर जखमी कुत्र्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर तीन दिवस कुत्र्यावर उपचार करण्यात आला तरी त्याचा मृत्यू झाला.  
 
हे आहे प्रकरण
मालाड रहिवासी महिलेला चर्चजवळ जखमी अवस्थेत कुत्रा दिसल्यावर त्यांनी प्राण्यांसाठी काम करणाऱ्या ‘अॅनिमल मॅटर टू मी’ या संस्थेला सूचित करत कुत्र्याला पशू चिकित्सालयात भरती करवले. महिलेप्रमाणे त्राण नसलेल्या अवस्थेत पडलेल्या कुत्र्याला स्पर्श केले तरी भीत होता. त्याला प्रचंड वेदना होत होत्या.
 
एनजीओप्रमाणे कुत्रा जखमी असून वेदनेमुळे किंचाळत होता. त्याच्या पाय आणि प्राइव्हेट पार्ट्सवर जखम्या झालेल्या होत्या. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे इन्फेक्शन झाले होते. तीन‍ दिवस डॉक्टरांचा उपचार सुरू होता तरी त्याला वाचवणे शक्य झाले नाही.  
 
इकडे त्या भागात चौकशी केल्यावर एका ऑटो ड्राइव्हरने सांगितले नशेत चार विकृतांनी कुत्र्यावर बलात्कार केला. त्यांनी कुत्र्याचे पुढील पाय आणि तोंड बांधले होते. कुत्रा आवाज करु लागला तर ड्राइव्हर तिथे पोहचेपर्यंत आरोपी तिथून फरार झाले. पोलिसांनी चार अज्ञात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल करुन घेतली आहे.