शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबईत शेतकर्‍यांचा मोर्चा, रस्त्यावर 20 हजार शेतकरी

आपल्या मागण्यांसाठी गुरुवारी शेतकर्‍यांनी मुंबईत मोर्चा काढला. या क्रांती मोर्च्यात शेतकरी मुंबई विधानभवन समोर प्रदर्शन करणार आहेत. मोर्च्यात 20 हजाराहून अधिक शेतकरी सामील आहेत. 
 
दुष्काळ निवारण, वनाधिकार कायदा आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, आदिवासी समस्या आणि कर्जमाफी अशा मागण्यांसाठी मोर्चा काढला गेला आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आमंत्रण पाठवले आहे. फडणवीस प्रतिनिधिमंडळाशी भेट घेतील.
 
उल्लेखनीय आहे की शेतकरी आणि आदिवासींनी बुधवारपासून ठाणे ते मुंबई पर्यंत दोन दिवसीय मोर्चा सुरू केला होता. आपल्या मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी बुधवारी ठाण्यात प्रदर्शन सुरू केले होते.