1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 एप्रिल 2017 (20:26 IST)

महाबळेश्वर मुंबईपेक्षाही जास्त तापले

महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरला इथले तापमान कमालीचे वाढले आहे. एवढेच नाही तर महाबळेश्वरचा पारा हा मुंबईपेक्षा जास्त चढल्याचे दिसत आहे. 13 एप्रिलला महाबळेश्वरचे तापमान 35.9 अंश सेल्सियस होते तर मुंबईतले तापमान 34.8 अंश सेल्सियस होते.
 
सौराष्ट्रातल्या उष्ण वाऱ्यामुळे हील स्टेशन्सवरच्या तापमानात वाढ झाली. गेल्या पाच सहा दिवसांपासून हील स्टेश्नवरच्या तापमानात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर राज्यात कोकण, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणीही कमालीचे तापमान वाढले आहे. राज्यात वाढणाऱ्या या तापमानाच्या पाऱ्यामुळे सर्वांच्या अंगाची लाहीलाही होताना दिसत आहे.