शनिवार, 17 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 डिसेंबर 2016 (14:38 IST)

महादेव जाणकार यांनी राजीनामा द्यावा विरोधक आक्रमक सभागृह तीनदा तहकूब

mahadev jankar
महाराष्ट्राचे नागपूर अधिवेशन सध्या सुरु आहे. इतक्या दिवस इतर कारणांनी सभागृहाचे कामकाज सुरु होते,मात्र आज पुन्हा ते बंद पडले आहे. भाजपा सोबत गेलेल्या माधव जाणकार यांनी निवडणूक अधिकाऱ्याला दिलेल्या धमकीमुळे हे प्रकरण वाढले असून विरोधक आक्रमक झाले आहेत. महादेव जानकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांचा विधान परिषदेत गोंधळ त्यामुळे  सभागृह दिवसभरासाठी तहकूब केले आहे. महादेव जानकर यांनी राजीनामा द्यावा, विधान परिषदेत विरोधकांची मागणी, स्थगन प्रस्ताव नाकारला असून  परिषद  तिस-यांदा सभागृह तहकूब केली आहे. महादेव जानकर यांना निलंबित करा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी केली असून यावेळी वाचाळ झालेल्या महादेव जाणकार यांना राजीनामा द्यावा लागेल अशी चिन्हे आहेत.