1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 11 जानेवारी 2017 (16:36 IST)

महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

mahapalika election
राज्यात होणाऱ्या 10 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांची आज घोषणा होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद होणार आहे. त्यामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल.
 
महापालिका आणि जिल्हा परिषदेची मतमोजणी 23 फेब्रुवारीला
 
21 फेब्रुवारीला महापालिकांसाठी मतदान
 
जिल्हा परिषद – दुसरा टप्पा 21 फेब्रुवारी
 
जिल्हा परिषद – पहिला टप्पा 16 फेब्रुवारी
 
सर्व दहा महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार
 
जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यात दहा जिल्ह्यांच्या निवडणुका
 
औरंगाबाद, जालन, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, गडचिरोली, जळगाव,
 
जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार, पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांच्या निवडणुका
 
केंद्रीय निवडणूक आयोगानं 5 जानेवारीला मतदार यादी जारी केली, त्यानुसार निवडणुका घेतल्या जातील
 
283 पंचायत समिती आणि 25 जिल्हा परिषदेच्या निवडणुका
 
नागपूर सोडून 25 जिल्हा परिषदांसाठी तारखा जाहीर होणार
 
नागपूर व्यक्तिरिक्त 25 जिल्हा परिषदा, 10 महापालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार
 
मार्च-एप्रिलमध्ये दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा, वेळापत्रक ठरवताना त्याचाही विचार
 
10 मनपांची मुदत 4 मार्चला संपणार
 
दहा महापालिकांची मुदत चार मार्चला संपणार