सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 नोव्हेंबर 2022 (14:42 IST)

महाप्रबोधन यात्रा पूर्ण करुन दाखवणार - सुषमा अंधारे

Sushma Andhare
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेते विविध यात्रा, सभा, दौरे या माध्यमातून पक्ष आणि संघटना एकसंध ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. एकीकडे आदित्य ठाकरे निष्ठा यात्रा आणि शिवसंवाद यात्रा काढत असून, दुसरीकडे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. मात्र, जळगावमधील त्यांच्या सभेला परवानगी नाकारली. यावरून ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आले असून, मला नजरकैदेत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण महाप्रबोधन यात्रा पूर्ण करुन दाखवणारच, असा एल्गार सुषमा अंधारे यांनी केला.
 
प्रसारमाध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, गुलाबराव पाटील गृहमंत्रालयाच्या आशीर्वादाशिवाय हे कसे करतील? देवेंद्र फडणवीसांना या सगळ्याची कल्पना नसेल का? प्रकाश सुर्वे हातपाय तोडायची भाषा करतात, सदा सरवणकर हवेत गोळीबार करतात. संजय गायकवाड चुन चुन के मारेंगे म्हणतात, नारायण राणे एकेरीने भाष्य करतात, संतोष बांगरांनी पोलिसांना केलेली शिवीगाळ हे सगळे चिथावणीखोर नाही का? पण या सगळ्यापैकी एकावरही काहीच कारवाई केली जात नाही. सभेसाठी परवानगी नाकारणे हा केविलवाणा प्रकार होता, असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला.
 
Edited by : Ratnadeep Ranshoor