संबंधित माहिती
- सुषमा अंधारे म्हणतात, ये डर मुझे अच्छा लगा
- "राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे वक्तव्य
- हे दादा कोण आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे जुळे भाऊ तर नाहीत ना?----सुषमा अंधारे
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची मी नक्कल केली नाही
- विनायक राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारेंसह सात जणांवर गुन्हा दाखल
ये डर मुझे अच्छा लगा, आय एन्जॉय- सुषमा अंधारे
सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जळगावात येण्याआधीच त्यांच्या कार्यक्रमाचे फलक (बॅनर) चोरी गेल्याचा प्रकार घडला. यावर सुषमा अंधारे यांनी जोरदार टोलेबाजी केली. “ये डर मुझे अच्छा लगा, आय एन्जॉय. मी या सर्व गोष्टींचा आनंद घेत आहे, मला मजा येत आहे,” अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी व्यक्त केली. त्या मंगळवारी (१ नोव्हेंबर) महाप्रबोधन यात्रेसाठी जळगावात आल्या असताना पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “ये डर मुझे अच्छा लगा, आय एन्जॉय. मी या सर्व गोष्टींचा आनंद घेत आहे, मला मजा येत आहे. तुम्ही बॅनर पळवत आहात, पण बॅनर पळवल्याने काय होणार आहे. तुम्ही बॅनर पळवू शकता, शिवसैनिक पळवू शकता का? तुम्ही शिवसैनिकाचा विचार पळवणार आहात का? तुम्ही शिवसैनिकांची आमच्यासोबत असलेली आपुलकी, आपलेपणा पळवू शकणार आहात का?”
Edited by : Ratnadeep Ranshoor
Edited by : Ratnadeep Ranshoor
