राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची मी नक्कल केली नाही
सुषमा अंधारे यांच्यासह खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, मधुकर देशमुख आणि अनिता बिर्जे यांच्यावर कलम 153 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्याने सुषमा अंधारेंवर गुन्हा दाखल झाला आहे. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्कल केल्यामुळं भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. तसेच नारायण राणे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याने विनायक राऊतांवर गुन्हा नोंदविण्यात आलाय. ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची मी नक्कल केली नाही. त्यामुळे नक्कल केली म्हणून कोणी सिद्ध करू शकणार नाही, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. देशाच्या राष्ट्रपती यांचं नाव घेणे काही गुन्हा आहे का?, असा सवालही भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.
दरम्यान, चिन्ह गोठवलं, नाव गोठवले एवढं झालं तरी लोक अजिबात खचले नाही. चौपट स्पिरीटनं लोक गर्दी करून जमले. कदाचित ही गर्दी बघून अस्वस्थ होणं. संजय राऊतांचे स्पिरीट आमच्याकडे आहे. ते स्पिरीट घेऊन आम्ही लढणार आहोत. नोटिशीला कायदेशीर उत्तर देऊ.
Edited by : Ratnadeep Ranshoor