सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (14:19 IST)

हे दादा कोण आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे जुळे भाऊ तर नाहीत ना?----सुषमा अंधारे

sushma andhare
शिवसेनेतील हे नेते आक्रमक शैलीत भाषण करताना शिंदे गटातील नेत्यांवर आणि भाजपवर जोरदार निशाणा साधत आहेत. त्यातच, सुषमा अंधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत, देवेंद्र फडणवीसांवरही टिकेची झोड उठवताना दिसून येताता. आता, पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टिका केली आहे. ठाण्यातील शिवसेनेच्या सभेत एकनाथ शिंदेंनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
 
महाप्रबोधन यात्रेत बोलताना सुषमा अंधारे यांनीही लाव रे तो व्हिडिओ .. म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जुना व्हिडिओ उपस्थित लोकांसमोर झळकावला. एका सभेत भाषण करताना एकनाथ शिंदें थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला होता. त्यावेळी, भाजपकडून होणाऱ्या अन्यायावर त्यांनी भाष्य केलं होतं. तसेच, मी अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. मी एक शिवसैनिक आहे, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटलं होतं. हा व्हिडिओ दाखवल्यानंतर सुषमा अंधारे यांनी प्रश्न विचारला. हे दादा कोण आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे जुळे भाऊ तर नाहीत ना? असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला होता. लोकं डोसक्याला गोडं तेल नाहीत लावत, त्यांना कळतं राजकारण, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदेंवर जबरी टीका केली. 
Edited by : Ratnadeep Ranshoor