शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 मे 2023 (14:36 IST)

महाराष्ट्र : राज ठाकरे यांच्या सभेत सामील होणार्‍या MNS नेत्याचे अपघातात मृत्यू

sandeep deshpande
महाराष्ट्रच्या रत्नागिरीहून एक वृत्त समोर येत आहे. मुख्य म्हणजे आज राज ठाकरे यांची येथे सभा आहे. अशात या सभेत सामील होण्यासाठी मनसेचे नेते रत्नागिरीसाठी निघाले असताना त्यांच्या कारचा अपघात झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मरण पारणार्‍या कार्यकर्तेचे नाव देवा साळवी आहे. मिळालेल्या माहितीनुसार तो दहिसर मनसेचे उपाध्यक्ष होते. या अपघातात तीन इतर लोकं गंभीररित्या जखमी झाले आहे ज्यांचा संगमेश्वरच्या दवाखाण्यात उपचार सुरू आहे. 
 
मनसे नेता संदीप देशपांडे यांनी दिली ही माहिती 
संदीप देशपांडे यांनी या अपघाताची माहिती दिली असून एका कार्यकर्तेचे निधन झाले आहे. या प्रसंगी बोलताना त्यांनी बारसू प्रोजेक्टबद्दल उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 
 
आज आहे राज ठाकरे यांची सभा 
या संदर्भात राज ठाकरे यांची आज रत्नागिरी येथे सभा आहे. आता सर्वांचे एक लक्ष्य आहे की या सभेत राज ठाकरे काय म्हणतील. 
Edited by : Smita Joshi