Maharashtra Marathi Breaking News Live Today :जालना येथे रविवार, 20 एप्रिल रोजी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शिव महापुराणाच्या वेळी भक्तांच्या अंगावर मोठा पंडाल कोसळला. या भीषण अपघातात 25 जण गंभीर जखमी झाले आहेत.एका अधिकाऱ्याने सांगितले की, 13 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जालना जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर 12 जणांना हसनाबाद येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.