1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Maharashtra Cabinet approves 5% reservation policy for players

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय; खेळाडूंसाठी सुधारित ५% आरक्षण धोरणाला मंजुरी, प्रगती योजनेला हिरवा कंदील मिळाला

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने पदक विजेत्या खेळाडूंसाठी सुधारित ५% आरक्षण धोरण, आरोग्य क्षेत्रासाठी आशियाई विकास बँकेच्या (ADB) सहकार्याने राबविण्यात येणारी 'प्रगती' योजना आणि माढा येथे नवीन न्यायालयाला मंजुरी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत क्रीडा, आरोग्य, वस्त्रोद्योग, कायदा व न्याय आणि महसूल विभागांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली. शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रांमध्ये पदक विजेत्या खेळाडूंसाठी सुधारित ५% आरक्षण धोरण लागू करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात यापूर्वी जारी केलेले सर्व शासकीय निर्णय, शुद्धिपत्रके, परिपत्रके आणि संबंधित पत्रे रद्द करण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने 'प्रगती' प्रकल्प सुरू करण्यास आणि सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे नवीन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था सुधारण्याच्या उपाययोजनांवरही मंत्रिमंडळात चर्चा झाली.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
ब्रिटिश संसदेत एकनाथ शिंदे यांना तीन आंतरराष्ट्रीय सन्मान मिळणार, लंडन दौऱ्यात महाराष्ट्राच्या दूरदृष्टीवर बोलणार