बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (20:30 IST)

Maharashtra Corona Rules : आजपासून नवी नियमावली लागू

uddhav thackeray
महाराष्ट्रातील कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्यानं ठाकरे सरकारनं लसीकरण अधिक झालेल्या जिल्ह्यांतील निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या आस्थापना सुरु होतील तेथील कर्मचाऱ्यांचं पूर्ण लसीकरण झालेलं आवश्यक आहे. तर, येणाऱ्या ग्राहकांचं देखील लसीकरण झालेलं असणं आवश्यक आहे. येत्या काळात कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन नवे आदेश लागू केले जाणार आहेत. राज्य सरकारनं जाहीर केलेली नवी नियमावली मुंबई, पुणे, भंडारा,गोंदिया, चंद्रपूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली. कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आजपासून लागू करण्यात येणार आहे. 
 
काय सुरु होणार?
राज्यातील 11 जिल्ह्यांना दिलासा लसीकरण अधिक झालेल्या जिल्ह्यांना निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. त्या जिल्ह्यातील 90% लोकांचा पहिला डोस पूर्ण हवे आहेत. जिल्ह्यात 70% लोकांचे दोन्ही डोस पूर्ण हवेत. राज्य सरकारच्या नव्या आदेशानं चौपाट्या,गार्डन सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
एस्सल वर्ल्डसारखे पार्क 50 टक्के क्षमतेनं
स्विमिंग पूल,वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेनं सुरु
हॉटेल,थिएटर 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार
सलून, स्पा 50 टक्के क्षमतेनं सुरु
लग्नासाठी 200 जणांना परवानगी
अंत्यविधीसाठी कोणतीही मर्यादा आली
सर्व कार्यक्रमांना 50 टक्के क्षमतेनं परवानगी
सर्व राष्ट्रीय पार्क आणि सफारी
पर्यटन स्थळ पुन्हा सुरू होणार
ऑन लाईन तिकीट बुकिंग होणार
स्थानिक प्रशासनाच्या वेळेनुसार बीचेस, गार्डन, पार्क खुली होणार
अम्युजमेंट/थीम पार्क 50 टक्के उपस्थितीत खुली होणार
वॉटर पार्क, स्विमिंग पूल 50 टक्के उपस्थितीत सुरू होणार
सलून आणि ब्युटी पार्लर च्या नियम प्रमाणे स्पा  50 उपस्थितीत टक्के सुरु करण्याची परवानगी
रेस्टॉरंट, थिएटर, नाट्यगृह 50 टक्के उपस्थितीत सुरू
भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम 50 टक्के उपस्थितीत हॉलमध्ये घेता येणार
लग्न समारंभ 25 टक्के लोकांच्या उपस्थितीत हॉल,
खेळाच्या स्पर्धा लोकांची 25 टक्के उपस्थिती
नाईट कर्फ्यू रात्री 11 ते सकाळी 5