शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 मे 2022 (09:09 IST)

महाराष्ट्राला पूर्वमोसमी पावसाचा तडाखा

नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून अरबी समुद्रात दाखल झाल्यानंतर आता राज्याला वरुणराजाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. जून महिन्यात 5 ते 7 तारखेपर्यंत मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
 
मान्सूनच्या आगमनाची वर्दी देणारा पूर्वमोसमी पाऊस राज्यात बरसायला सुरुवात झाली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये सध्या वादळी वाऱ्यांसह पाऊस पडत आहे. यामुळे शेतीमाल आणि आंब्याचे नुकसान होताना दिसत आहे
पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर आणि नगरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत आहे. त्यामुळे पंढरपूर, अहमदनगर, वाशिम, सांगलीत शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालं आहे. पंढरपूर परिसरात वादळी वारे आणि पावसाने द्राक्षं, बेदाणे शेड उद्ध्वस्त झालं आहे. तर अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांच्या केळी, द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागेचं मोठं नुकसान झालं आहे.