गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 मे 2022 (09:04 IST)

राज यांचा अयोध्या दौरा स्थगित, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे म्हणाले...

sandeep deshpande
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  अध्यक्ष राज ठाकरे  येत्या 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु राज ठाकरे यांनी हा दौरा स्थगित केला आहे. यासंदर्भात स्वत: टि्वट करत माहिती दिली. यावर मनसे नेते बाळ नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलतांना स्पष्टीकरण दिले.

बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेसंदर्भात आज बैठक झाली. या बैठकीत सभेसंदर्भात चर्चा करण्यात आली. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द नाही तर स्थगित झाला आहे. यासंदर्भात पुण्यातील सभेत राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. अयोध्या दौरा स्थगित करण्यामागचं कारण पुणे सभेत स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संदीप देशपांडे म्हणाले...
मनसे नेते संदीप देशापांडे यांनीही आज पत्रकार परिषद घेतली. आम्ही फरार नव्हे तर भूमिगत होतो, असे त्यांनी सांगितले. राज्य सरकार आमच्यावर सूड उगवत आहे. आमचा पोलिसांना कोणताही धक्का लागला नव्हता. धक्का लागल्याचे फुटेज दिल्यास राजकारण सोडेल, असे आव्हान त्यांनी दिले. जबरदस्तीने मला 14 दिवस 1 महिने जेलमध्ये ठेवण्यचा कट होता. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौरा होणारच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तुर्त हा दौरा स्थगित असून त्याचे सविस्तर उत्तर पुण्यातील सभेतून मिळणार असल्याचे राज यांनी सांगितले.