सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (08:06 IST)

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी फडणवीस यांची घेतली भेट

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
 
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी  देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आज बोलावण्यात आली आहे. या बैठकीआधी बाळा नांदगावकर हे फडणवीसांच्या भेटीला पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आशिष शेलार देखील आधीपासूनच उपस्थित होते. फडणवीसांची भेट घेऊन आल्यानंतर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
 
मी माझ्या वैयक्तिक कामासाठीच आलो होतो. फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. राज ठाकरे यांनीच फोन केला होता, त्यामुळे भेटण्यासाठी वेळ दिला होता. दोन राजकारणी एकत्र भेटले तर राजकीय चर्चा होते असते, असंही नांदगावकर म्हणाले.
 
तसंच, आर्यन खान अटक प्रकरणावरून अनेक आरोप प्रत्यारोप होत आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याची माहिती समोर आली आहे, हे योग्य नाही, अस मतही बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलं.