मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (21:35 IST)

महाराष्ट्रात सिनेमा-नाट्यगृह सुरु करण्यासाठीचे नियम काय आहेत?

महाराष्ट्रातील कोव्हिडची स्थिती पाहता, राज्यातील सिनेमागृह, नाट्यगृह आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना 22 ऑक्टोबर 2021 पासून परवानगी देण्यात आली आहे. याबाबतची घोषणा राज्य सरकारनं 25 सप्टेंबर 2021 रोजी केली होती.
 
मात्र, महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयानं सिनेमागृह, नाट्यगृह आणि इतर कार्यक्रम सुरू करण्यासाठीचे नियम आज (12 ऑक्टोबर) जाहीर केले आहेत. कोव्हिडची स्थिती लक्षात घेऊन हे नियम बनवण्यात आलेत. त्यानुसारच कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलीय.
या नियमांचं पालन करूनच नाट्यगृह, सिनेमागृह आणि इतर कार्यक्रम सुरू करावे लागतील, अन्यथा नियमानुसार कारवाईचा इशाराही राज्य सरकारकडून देण्यात आलाय
सिनेमागृहांसाठी 'हे' आहेत नियम
कंटेन्मेंट झोनमध्ये सिनेमे दाखवता येणार नाहीत.
दोन सीट्समध्ये सहा फुटांचं अंतर असणारी आसनव्यवस्था असावी.
प्रेक्षकांना मास्कशिवाय सिनेमागृहात प्रवेश देऊ नये.
स्पर्श न करता वापरता येणारं सॅनिटायझर यंत्र प्रवेशद्वारावर आणि कॉमन एरियात असावं.
थुंकण्यास सक्त मनाई करावी.
फूड कोर्ट, सफाई किंवा इतर ठिकाणच्या सर्व कर्मचाऱ्यांचे लशीचे दोन डोस पूर्ण झालेले असावेत किंवा पहिला डोस घेतला असल्यास 14 दिवसांनंतरच त्यांना कामावर घ्यावं.
मॉलमध्ये मल्टिप्लेक्स असल्यास दोन्ही डोस पूर्ण न झालेले आणि 18 वर्षांखालील व्यक्तींना परवानगी देऊ नये.
प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनिंगची सोय असावी.
सिनेमागृह एकूण क्षमतेच्या केवळ 50 टक्केच क्षमतेत सुरू करता येईल.
तिकीट बुकिंगासाठी डिजिटल बुकिंगला प्राधान्य द्यावं.
सिनेमागृहाचा परिसर सातत्यानं स्वच्छ राखला गेला पाहिजे आणि सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घ्यावी.
सिनेमागृहातील एसी 24 ते 30 सेल्सिअसच्या दरम्यानच असावी.
व्हेंटिलेशनसाठी योग्य ती सोय असावी
 
नाट्यगृहांसाठी 'हे' आहेत नियम
कंटेन्मेंट झोनमधील नाट्यगृहांना सुरू करण्यास अद्याप परवानगी नाही.
सुरक्षेच्या अंतराबाबत प्रवेश्वार आणि कॉमन एरियात जमिनीवर खुणा आखाव्यात.
नेमलेल्या व्यक्तींनाच पडदा, पडद्यामागील वस्तू इत्यादी हाताळण्याची परवानगी द्यावी.
नाट्य कलावंत आणि कर्मचारी यांनी स्वत:ची नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
रंगभूषा कक्षासह सर्व ठिकाणी स्वच्छता राखावी.
कर्मचाऱ्यांना मास्क वापरण्याची सक्ती करावी, तसंच सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावा.
संगीत, माईक, प्रकाश योजना इत्यादी गोष्टी हाताळणाऱ्यांनीच संबंधित साधनं वापरावी.
नाटकाच्या प्रयोगपूर्वी किंवा नंतर कलाकारांना भेटण्याची परवानी देऊ नये.
रंगभूषाकाराने हात साबणाने धुतले पाहिजेत.
रंगभूषेदरम्यान प्रत्येक कलाकारासाठी स्वतंत्र ब्रश, रंग इत्यादी वापरावे.
कलावंताने स्वत:ची रंगभूषा, केशभूषा स्वत:च करण्याचा प्रयत्न करावा.
रंगभूषेत वापरल्यानंतर फेकून देता येतील अशी साहित्य वापरावीत.
नाट्यगृह 50 टक्के क्षमतेनेच सुरू करावीत, त्यानुसार अंतर राखून आसनव्यवस्था ठेवावी.
तिकीट रांगेचं नीट व्यवस्थापन करून, सुरक्षित अंतर राखलं जावं.
नाटकाच्या प्रयोगपूर्वी आणि नंतर कोव्हिडसंदर्भातील जनजागृतीची ध्वनीफित वाजवण्यात यावी.
 
इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी 'हे' आहेत नियम
सभागृहात प्रवेश देताना थर्मल टेस्टद्वारे तपासणी करावी.
एकूण क्षमतेच्या 50 टक्केच क्षमतेत सभागृहात उपस्थिती असावी.
आसनव्यवस्थेत 6 फूटांचं अंतर राखावं.
सर्व परिसर, स्वच्छतागृह, खोल्या इत्यादींची स्वच्छता राखावी.
कर्मचाऱ्यांसह सर्वांनी मास्क वापरणं बंधनकारक आहे.
कार्यक्रमाच्या ठिकाणी खाद्यपदार्थ, पेय विक्रीस बंदी राहील.
सभागृह वातानुकूलित असल्यास 24 ते 30 सेल्सिअसदरम्यान एसी ठेवावा.
सभागृहात रंगभूषाकाराची आवश्यकता असल्यास, त्यानं पीपीई किट वापरावी.
गर्दी होणार नाही, याची दक्षता आयोजकांना घ्यावी लागेल.