शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (16:10 IST)

कथित ऑडिओ क्लिपमुळे रामदास कदमांना दसरा मेळाव्याला नो एंट्री?

शिवसेनेचा दसरा मेळावा  यंदा प्रत्यक्षात काही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये होणार असून शिवसेना खासदार संजय राऊतांनी जागेची घोषणा केली आहे. या दसरा मेळावाव्याला शिवसेनेचे प्रमुख नेते, ज्येष्ठ नेते, आमदार, खासदार, महापौर उपस्थित असतील. यातच अशी माहिती समोर येत आहे की, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांना दसरा मेळाव्यात येण्याची परवानगी नसेल. कथित ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे रामदास कदमांना या दसरा मेळाव्याला नो एंट्री असेल. 
 
शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा प्रत्यक्ष होणार असून मोजक्या आणि महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे. या दसरा मेळाव्याला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांना उपस्थित राहण्याची परवानगी नसेल अशी चर्चा आहे. तसेच सामान्य शिवसैनिकांनाही परवानगी नाकारण्यात आली आहे. केवळ ५० टक्के उपस्थितांमध्ये शिवसेना दसरा मेळावा होणार आहे.
 
शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याबद्दलची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांना दिली असल्याचा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांच्याविरोधात करण्यात आला आहे. या प्रकरणात काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या असून यामध्ये रामदास कदम यांचा आवाज आहे. यामुळे रामदास कदम यांनीच माहिती दिली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या सर्व प्रकरणामुळे शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतप्त आहेत. तसेच रामदास कदम यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते आहे.