बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (15:51 IST)

जळगावासह काही भागात १६ व १७ ऑक्टोबरला वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसाची शक्यता

राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या २४ तासात राज्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात येत्या २४ तासात मेघ गर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे तर शनिवारी विदर्भातील काही भागात देखील अशाच स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जळगावासह काही भागात १६ व १७ ऑक्टोबर रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे.
 
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदूर्ग,रायगड तसेच कोल्हापूर, सातारा, पुणे, वाशिक जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर शनिवारी १६ ऑक्टोबरला वर्धा, नागपूर,भंडारा, गोंदिया,चंद्रपूर,गडचिरोली या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे.राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.