शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई: , मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (19:04 IST)

नितीन राऊत यांचे महावितरणला निर्देश, विजेचे दर कमी करा

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी  राज्यातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्यात वीजेचे दर कमी करण्यासाठी व शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज पुरवठा देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत महावितरणला दिले.  
 
नवीन कृषिपंप वीज धोरणात शेतकऱ्यांना 8 तास दिवसा वीज देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तथापि कृषीपंप वीज वाहिन्या अतिभारीत (ओव्हरलोड) होत असल्याच्या तक्रारी मिळत असल्याने वीज वाहिन्यांचे जाळे सक्षम करणे. रोहित्रांची संख्या व क्षमता वाढविण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम त्वरित करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्यातील किती ठिकाणी आणि कोणते रोहित्र दिवसा 8 तास वीज देण्यास सक्षम नाही, हे शोधून त्यांच्या सक्षमीकरणासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.