गुरूवार, 11 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 फेब्रुवारी 2022 (15:49 IST)

आम्ही किंगमेकर कशाला आम्हाला तर किंग बनायचे : बाळा नांदगावकर

Why do we want to be a Kingmaker? Bala Nandgaonkar
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व पदाधिकारी आणि नेते मंडळींची बैठक बोलावली होती. शिवतीर्थावर ही बैठक घेण्यात आली असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची होती. मनसेकडून टीम स्थापन करण्यात येणार असून या टीम महापालिकांच्या निवडणुकीबाबत अहवाल सादर करणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. तसेच मनसेला आता किंग बनायचे आहे किंग मेकर नाही असे वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केले आहे. हे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवतीर्थावर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला आहे.
 
या बैठकीमध्ये येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी प्रत्येक ठिकाणी जाऊन कशी करायची त्याची सर्व माहिती आणि सूचना दिल्या आहेत. कुठल्या विभागात कोणती टीम जाणार याची यादी संध्याकाळी देण्यात येणार आहे. या यादीसोबत तिकडे जाऊन काय काम करायचे त्याची लेखी स्वरुपात माहिती देण्यात येणार असल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
 
मुंबई महानगर पालिका निवडणुकीबाबत अद्याप चर्चा झाली नहाी. मात्र मुंबईसोडून, नाशिक, पुणे आणि इतर पालिकांबाबत चर्चा झाली आहे. त्या त्या ठिकाणी आता टीम जाणार आहेत. प्रत्येक टीममधून प्रत्येकी अहवाल देण्यास सांगितले आहे. यानंतर एकदा कोर टीमची बैठक होईल आणि मुंबईत कोणती टीम काम करणार याबाबत ठरवण्यात येणार आहे. या टीमध्ये ३ ते ४ सदस्य असतील असे बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.