शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 7 मे 2023 (14:36 IST)

Maharashtra Politics: संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

sanjay raut
महाराष्ट्रात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार असून शिवसेना खासदार संजय राऊत हे 10 जूनपूर्वी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या संदर्भात त्यांच्या बैठका देखील झाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. आणि असा दावा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.  या दाव्यामुळे राजकीय चर्चा सुरु झाल्या आहे. 
 
आमदार नितेश राणे म्हणाले की येत्या 10 जून पूर्वी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या दिवशी संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहे. त्या संदर्भात त्यांच्या बैठका झाल्या आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नितेश राणे यांच्या या दाव्यानंतर राजकीय चर्चा रंगू लागली आहे.
 
संजय राऊतांनी अजित दादांनी पक्ष सोडला की मी लगेच पक्षात प्रवेश करणार असे सांगितले आहे. ते सतत अजितदादांवर टीकास्त्र सोडत आले आहे. मी आता राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार असून आता उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहण्यात काहीही अर्थ नाही. असे राऊत यांनी म्हटल्याचं, नितेश राणे म्हणाले.   

Edited by - Priya Dixit