सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 12 जुलै 2021 (16:08 IST)

Maharashtra SSC result:महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल या आठवड्यात जाहीर होऊ शकतो

महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल या आठवड्यात जाहीर होऊ शकतो.निकाल जाहीर झाल्यानंतर मंडळाची अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर तपासता येईल. राज्यभरात सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.बोर्ड निकालाची तयारी करत आहे. निकाल जाहीर होण्याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.
 
यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल मूल्यांकन मानक धोरण (निकष) अंतर्गत प्रसिद्ध केले जाणार आहे. वास्तविक, कोरोना महामारीमुळे माध्यमिक विद्यालय प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षा रद्द झाली.राज्यातील शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यावर्षी दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विध्यार्थ्यांना  पुढील वर्गात पदोन्नती देण्यात येईल असा निर्णय घेतला होता.यावर्षी दहावीतील विद्यार्थ्यांचे गृहकार्य मौखिक कामगिरी आणि 9 वीच्या परीक्षेनुसार मूल्यांकन केले जाईल.