शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 डिसेंबर 2022 (12:35 IST)

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

result
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून TET ची परीक्षा 2021 मध्ये घेण्यात आली होती. त्याचा निकाल जाहीर केला असून राज्य भरातून लाखो विद्यार्थी बसलेले होते. त्याचा निकाल 3.70 टक्के लागला आहे. या परीक्षेच्या पहिल्या पेपरसाठी2,54,478 विद्यार्थी बसले होते.त्या पैकी 967 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दुसऱ्या पेपरसाठी सहावी ते आठवी साठी 64,647 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 937 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर सामाजिक शास्त्र सहावी ते आठवी साठी एक लाख 49 हजार 604 विद्यार्थी बसले होते त्यात 6 हजार 711 उत्तीर्ण झाले. 
 
राज्यात पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती केली जाते. 2019 मध्ये 12 हजार शिक्षकांची मोठी शिक्षक भरती करण्यात आली. राज्यात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असताना शिक्षक भरतीची मागणी वारंवार केली जात आहे.TET परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आली होती. त्यापैकी पहिली ते पाचवी पेपर पहिला आणि सहावी ते आठवी पेपर दुसरा याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. 
राज्यभरातून TET च्या परीक्षेसाठी तब्बल 4 लाख 68 हजार 679 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 17 ,322 उत्तीर्ण झाले. 
 
Edited by - Priya Dixit