मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 डिसेंबर 2022 (08:57 IST)

नव्या झुआरी चौपदरी पुलाचे 29 रोजी उद्घाटन, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी राहणार उपस्थित

वास्को :झुआरी नदीवरील पहिल्या टप्प्यातील चौपदरी पुलाचे उद्घाटन येत्या गुरूवारी 29 रोजी करण्याचे निश्चित झालेले असून केंद्रीय भुपृष्ट वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संध्याकाळी 6 वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर दि. 30 पासून सर्व वाहनांसाठी हा पुल खुला होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरूवारी या पुलाची पाहणी करताना उद्घाटनाचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री निलेश काब्राल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, दिलीप बिल्डकॉन कंपनीचे अधिकारी व वाहतूक पोलीस अधिकारीही उपस्थित होते.
 
उत्तर व दक्षिण गोव्याला जोडणाऱया झुआरी नदीवरील हा दुसरा पुल वाहतुकीसाठी खुला होण्याची गोव्यातील जनतेला प्रतीक्षा आहे. हा पुल वाहतुकीस खुला झाल्यानंतर आगशी, कुठ्ठाळी ते वेर्णापर्यंत होणाऱया वाहतूक कोंडीची समस्या संपुष्टात येणार आहे.  त्यामुळे नवीन पुल लवकरात लवकर सुरू होणे आवश्यक होते. जनतेची प्रतीक्षा येत्या 29 रोजी संपणार आहे.
 
उद्घाटन समारंभाची जय्यत तयारी
झुआरी नदीवरील या आठ पदरी पुलाच्या पहिल्या टप्प्यातील एका बाजुच्या चौपदरी पुलाचे काम पूर्ण झालेले असून 29 रोजी संध्याकाळी 6 वाजता या पुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम या पुलावरच होणार आहे. उद्घाटन समारंभाची जय्यत तयारी सरकारी पातळीवर सुरू झालेली आहे. गुरूवारी सकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री निलेश काब्राल यांनी संबंधीत अधिकाऱयांसह या पुलाची पाहणी केली व काही विशिष्ठ सुचना यावेळी त्यांनी अधिकाऱयांना केल्या.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor