1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 मार्च 2023 (19:35 IST)

Maharashtra Weather Updates: महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे संकट ,शेतकरी चिंतेत

Maharashtra Weather Updates premature rains in Maharashtra  Rain Update News Rain In Maharashtra
काही दिवसांपासून महाराष्ट्रातील वातावरणात सारखे बदलत आहेत. दिवसा उन्हाचा तडाखा तर रात्री थंडीची हुडहुडी जाणवत आहे. आता हवामान खात्याने राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांवर संकट ओढावलं आहे. दुसरीकडे गाटपीट होण्याची शक्यता असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत आहे. अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक भागात पावसामुळे पिकांवर संकट आले आहेत. हवामान खात्यानं 5 मार्च ते 7 मार्च पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील मराठवाड्यात तसेच वाशीम, अमरावती ,अकोला भागात गारपीटची शक्यता  वर्तवली आहे. हवामान खात्यानं येत्या 7 मार्च पासून पावसाचा इशारा दिला आहे.

वसई विरार भागात देखील अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. देशाच्या वायव्य दिशेकडून बंगालच्या उपसागरात सागराहून वारे वाहत आहेत. तसेच अरबी समुद्रातून नैऋत्येकडून वायव्य भारताच्या दिशेने सरकणारे पण उत्तर महाराष्ट्राकडे वळणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांचा मिलाफ होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. 6 मार्च संध्याकाळपासून ते बुधवार दिनांक 8 मार्चपर्यंत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, नाशिक, येवला, नांदगाव, दिंडोरी, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा तसेच खान्देश, अहमदनगर, पुणे, सातारा, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, हिंगोली आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसाचा (Rain Alert) अंदाज वर्तवण्यात आला आहे.अवकाळी पावसामुळे हवामान थंड झाले असून रबीच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. या मुळे शेतकरी चिंतेत आला आहे. अवकाळी पावसामुळे गहू, हरबरा, मका , फळे पालेभाज्या ,आंबा ची पिकांना फटका बसून शेतकरी चिंतेत आहे. हवामान बदलाचा शेतपिकांवर परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्याने वर्तवली आहे.
 
Edited By - Priya Dixit