महाराष्ट्र झुकणार नाही अन् थांबणारही नाही : आदित्य ठाकरे
आयकर विभागानं आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल, शिवसेना नेते संजय कदम, बजरंग खरमाटेंच्या घरांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यानंतर शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरेंनी या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया दिलीय.
केंद्रीय यंत्रणा आता भाजपच्या प्रचार यंत्रणा झाल्यात. महाराष्ट्रावर आधीही अशा प्रकारची आक्रमणं झालेली आहेत. हे दिल्लीचं आक्रमणही असंच आहे. शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते. महाविकास आघाडीची भाजपला भीती वाटू लागली आहे. यूपी, हैदराबाद, पश्चिम बंगालमध्येही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आलीय. जिथे निवडणुका आहेत, त्या राज्यात ते अशा कारवाया करत आहे. महाराष्ट्र हा झुकणार नाही अन् थांबणारही नसल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलंय.